उद्धव ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार? निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश

उद्धव ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार? निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश

लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानादिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानादिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि भाजपवर त्यांनी आरोप केलं होते.

या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील मतदानादिवशी उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मतदाना दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत चौकशी करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत काही वादग्रस्त असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचंही आयोगाने सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com