मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक, टाटा पॉवरचा 58-121% दरवाढीचा प्रस्ताव

मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक, टाटा पॉवरचा 58-121% दरवाढीचा प्रस्ताव

मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. टाटा वीज कंपनीने 1 एप्रिलपासून वीज बिल दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. टाटा वीज कंपनीने 1 एप्रिलपासून वीज बिल दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागणार आहे. 2022-23 आणि 23-24 या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे. टाटा वीज कंपनीने 0 ते 100 युनिटसाठी तब्बल 201 टक्के वाढ प्रस्तावित असून 100 ते 300 युनिटपर्यंत 60 टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. तर 301 ते 500 युनिटपर्यंत 10 टक्के वाढीचा प्रस्ताव आहे.

2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे. दरमहा सुमारे 300 किंवा 500 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना बिले पाठविणे आणि ती वसूल करणे, हे काम कठीण असते. या पाश्र्वभूमीवर 0-100 युनिटसाठी तब्बल 201टक्के वाढ प्रस्तावित असून 100 ते 300 युनिटपर्यंत 60 टक्के व 301 ते 500 युनिटपर्यंत 10 टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास टाटा कंपनीचे 500 युनिटपर्यंतचे दर अदानींच्या कंपनीपेक्षा अधिक असतील. त्यामुळे ग्राहक अदानींकडे परतण्याची शक्यता आहे.

दरम्यान, टाटा पॉवर कंपनीने 1 एप्रिलपासून वीज दरात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. टाटा पॉवरने दरमहा 100 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी प्रति युनिट दर सध्याच्या 3.74 रुपयांवरून 7.37 रुपयांपर्यंत वाढ करण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. साधारण ग्राहकांना 50 टक्के आर्थिक भूर्दंड बसणार आहे. वीज नियामक आयोगाने टाटाचा प्रस्ताव मंजूर केल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com