twitter sold ऍलन मस्क टि्वटरचे नवे मालक, आता काय बदल होणार जाणून घ्या

twitter sold ऍलन मस्क टि्वटरचे नवे मालक, आता काय बदल होणार जाणून घ्या

Published by :
Team Lokshahi

अखेरी ऍलन मस्कने (Elon Musk) टि्वटर ही कंपनी विकत घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून टि्वटर विकली (Twitter Sold) जाणार असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. एएफपी वृत्त संस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. 44 मिलियन डॉलर (44 Million Dollar) इतकी किंमत मोजत ऍलन मस्कनं ट्विटरची खरेदी केली. टि्वटरचे इंडिपेंडेंट बोर्डचे चेअरमन ब्रेट टेलर यांनी ही माहिती दिली.

टि्वटरच्या संचालक मंडळाने अखेर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचा प्रस्ताव मान्य केला. सोमवारी रात्री उशिरा 11 सदस्यीय मंडळाने 54.20 डॉलर प्रति समभाग किमतीत विक्री प्रस्तावाला मंजुरी दिली. ही किंमत कंपनीच्या समभागाच्या 1 एप्रिल रोजीच्या बंद भावापेक्षा 38 टक्के जास्त आहे. मस्क कंपनीच्या मालकी हक्कासाठी टि्वटरला 4400 कोटी डॉलर(सुमारे 3.37 लाख कोटी रु.) रोकड देतील. हा व्यवहार एका वर्षात पूर्ण होऊ शकतो. कंपनी आता यावर शेअरधारक आणि नियामकांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू करेल.

या व्यवहारानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मस्क बहुचर्चित मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे मालक होतील. या वृत्तानंतर नॅसडॅकमध्ये सोमवारी टि्वटरचे समभाग 6.87% उसळून 52.29९ डॉलरवर गेले. मस्क यांनी खरेदीचा प्रस्ताव अलीकडे दिला होता.

twitter sold ऍलन मस्क टि्वटरचे नवे मालक, आता काय बदल होणार जाणून घ्या
Navneet Ravi Rana |मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात हरियाणात याचिका, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप

ट्विटरमध्ये मोठ्या बदलांची शक्यता

टेस्लाचे सीईओ ऍलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासूनच तयारी दाखवली होती. आता त्यांनी ही कंपनी घेतल्यानंतर डिजिटल माध्यमाच्या व्यवसाय क्षेत्रात खूप मोठा बदल होईल, असा विश्वासही जाणकारांनी व्यक्त केला. सुरुवातीला ऍलन मस्क यांना संचालक मंडळावर नेमण्यास टि्वटरच्या संचालकांनी तयारीही दाखवली होती.

twitter sold ऍलन मस्क टि्वटरचे नवे मालक, आता काय बदल होणार जाणून घ्या
रणबीर आलियाच्या लग्नानंतर आता आणखी एक नवा खुलासा समोर...

जगभरात 217 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते

जगभरात 217 दशलक्ष टि्वचरचे सक्रिय वापरकर्ते आहेत. यावरून मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे महत्त्व तपासले जाऊ शकते. यापैकी सर्वाधिक 77 दशलक्ष अमेरिकेत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जपान आहे, जिथे 58 दशलक्ष लोक ट्विटर वापरतात. त्याच वेळी 24 दशलक्ष वापरकर्त्यांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com