Elon Musk यांचा ट्विटर खरेदीचा करार रद्द, फेक अकाऊंट ठरले कारण

Elon Musk यांचा ट्विटर खरेदीचा करार रद्द, फेक अकाऊंट ठरले कारण

टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) विकत घेणार नसल्याचं जाहीर केलंय.
Published by :
Shweta Chavan-Zagade

टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी शुक्रवारी ट्विटर विकत घेण्यासाठीचा ४४ अब्ज डॉलर्सचा करार रद्द केला आहे. ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी फेक अकाउंटची माहिती देण्यात अपयशी ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या करारातून माघार घेतल्यानंतर ट्विटर आता इलॉन मस्क यांच्यावर खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं अटी मोडल्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळं आता ट्विटरची 44 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आला.

Elon Musk यांचा ट्विटर खरेदीचा करार रद्द, फेक अकाऊंट ठरले कारण
Ashadhi Wari 2022 : आषाढीची लगबग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महापूजेसाठी पंढरपूरमध्ये

एलॉन मस्क यांनी शुक्रवारी यासंदर्भात घोषणा करत, आपण ट्विटर विकत घेणार नसल्याचं सांगितलं. मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केलेत. मस्क यांनी म्हटलंय की, 'ट्विटर कंपनी बनावट खात्यांचा (Fake Accounts) तपशील देण्यात अयशस्वी ठरलीय.' दरम्यान, एलॉन मस्कच्या या निर्णयाविरोधात ट्विटर कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे.

Elon Musk यांचा ट्विटर खरेदीचा करार रद्द, फेक अकाऊंट ठरले कारण
Skin Care Tips : काचेसारख्या त्वचेसाठी वापरा 'हे' पाच टीप्स

ट्विटरवर किती बनावट हँडल (Fake Twitter Handle) आणि किती स्पॅम करणारी हँडल (Spam Twitter Handle) आहेत याची ठोस माहिती मागितली होती. ही माहिती मिळत नसल्यामुळं ट्विटर खरेदी करण्याची योजना रद्द करत असल्याचं एलॉन मस्कनं जाहीर केलं. पण, मस्कच्या या घोषणेमुळं बाजारातील ट्विटरच्या विश्वासार्हतेवर परिणाम झालाय. शेअर बाजारातील ट्विटरची पत घसरलीय. मस्कच्या कृतीमुळं झालेलं नुकसान त्यानं भरून द्यावं, असं ट्विटरच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com