Elon Musk
Elon Musk

Elon Musk यांची संपत्ती ४०० बिलियन डॉलर पार, इतिहासातील पहिले व्यक्ती

इलॉन मस्क यांची नेट वर्थ ४०० बिलियन डॉलर्स पार! स्पेस एक्स आणि टेस्लाच्या यशामुळे मस्क इतिहासातील पहिले ४४७ अब्ज डॉलर्स संपत्ती असणारे व्यक्ती ठरले.
Published by :
Published on

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर इलॉन यांची संपत्ती टर्बोचार्ज झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींसाठी त्यांना आता नवा मैलाचा दगड ठेवला आहे. $400 अब्ज डॉलर्सचा आकडा गाठणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, मस्क यांची संपत्ती ४४७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली असल्याच कळतंय. या यादीत ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस एकूण २४९ अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहेत. तर मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग २२४ अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानी आहेत.

मस्क यांच्या संपत्तीत इतकी वाढ कशी झाली?

मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीचे श्रेय त्याची खासगी अंतराळ संशोधन कंपनी SpaceX च्या अंतर्गत शेअर विक्रीला दिले जात आहे. नुकत्याच झालेल्या इनसाइडर शेअर्सच्या विक्रीमध्ये SpaceX ने कर्मचारी आणि कंपनीच्या इनसाइडर्सकडून १.२५ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले होते, असे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या व्यवहारामुळे SpaceX चे मूल्य सुमारे ३५० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढलं आहे. यामुळे जगातील सर्वात मौल्यवान खासगी स्टार्टअप म्हणून त्याचे स्थान मजबूत झाल्याचीही चर्चा आहे.

ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मस्क यांना विशेष स्थान

इलॉन मस्क हे ट्रम्प यांच्या प्रस्तावित डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी (DOGE) चे सह-प्रमुख असतील. विवेक रामास्वामी यांच्यासमवेत ते नवीन ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी’ पाहतील.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com