गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लॅंडिंग

गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लॅंडिंग

गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar

गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. प्रतिकूल हवामानामुळे त्यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. गुवाहाटीच्या लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे लँडिंग करण्यात आलं.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आगरतळा दौऱ्यावर जात आहेत. भाजपाने त्रिपुरात रथयात्रेचं आयोजन केलं आहे. याच रथयात्रेचं उद्घाटन करण्यासाठी अमित शाह गुरुवारी सकाळी आगरतळाला रवाना होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com