अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सहाव्या, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी,महागाई भत्ता देण्याची मागणी त्यांची आहे. प्रलंबित मागण्यांचा निपटारा करण्यासाठी आयुक्तांची नकारघंटा दाखवल्याचे समजते आहे.

बेमुदत कामबंद आंदोलन करत कर्मचारी संपावर जाणार आहेत. कर्मचारी संपावर गेल्याने मनपाचं कामकाज मात्र ठप्प होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com