Ind vs Eng 1st Test Match : खेळाडूंच्या शतकांचा डोंगर; तरीही भारताने पहिला कसोटी सामना गमावला, इंग्लंडचा 5 गडी राखून विजय

Ind vs Eng 1st Test Match : खेळाडूंच्या शतकांचा डोंगर; तरीही भारताने पहिला कसोटी सामना गमावला, इंग्लंडचा 5 गडी राखून विजय

इंग्लंडच्या संघानं या धावांचा पाठलाग करत 5 गडी गमावून 373 धावा केल्या.
Published by :
Rashmi Mane
Published on

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होताच भारताने प्रथम फलंदाजी करत 471 धावांचा डोंगर रचला. पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या फलदाजांनी उत्तम खेळी करत तीन जणांनी दमदार शतक ठोकले. यामध्ये शुभमन गील, ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालच्या नावांचा समावेश होता. तर इंग्लंडचा संघ पहिल्या इनिंगमध्ये सर्व गडी बाद 465 धावांमध्ये संपुष्टात आली. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने पुन्हा जोषात फलंदाजी करत 364 धावा केल्या. याहीवेळी ऋषभ पंत आणि के. एल. राहुल यांची शतकी खेळी पाहायला मिळाली. तर इंग्लंडला 371 धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या संघानं या धावांचा पाठलाग करत 5 गडी गमावून 373 धावा केल्या. या विजयासह इंग्लंड संघाने भारताविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकला. मात्र अजून चार कसोटी सामने खेळले जाणार असून भारताला आणखी उत्तम खेळ दाखवण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा

Ind vs Eng 1st Test Match : खेळाडूंच्या शतकांचा डोंगर; तरीही भारताने पहिला कसोटी सामना गमावला, इंग्लंडचा 5 गडी राखून विजय
MNS - Thackeray Breaking : आताची मोठी बातमी!, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची होणार एकत्र पत्रकार परिषद
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com