Ileana D'Cruz : 'मैं तेरा हिरो' फेम अभिनेत्रीने झाली दुसऱ्यांदा आई, दाखवली बाळाची पहिली झलक
बॉलिवूड अभिनेत्री इलीआना डिक्रूझ तिचे पती मायकेल डोलन यांच्या घरी दुसऱ्या अपत्याचे आगमन झाले असून, त्यांनी आपल्या बाळाचे नाव कियानू राफे डोलन ठेवले आहे. शनिवारी इलीआनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. “Introducing Keanu Rafe Dolan. Born on June 19, 2025,” असे कॅप्शन देत तिने बाळाचा जन्म जाहीर केले.
ही आनंदवार्ता काही आठवड्यांनंतर आली आहे, ज्या वेळी इलीआनाने आपल्या दुसऱ्या गर्भधारणेची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. मे महिन्यात तिने एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात तिचा बेबी बंप दिसत होता आणि त्यावर “Bump buddies” असे कॅप्शन होते. मात्र यावेळी तिने जास्त माहिती उघड केली नव्हती. पहिल्या गर्भधारणेप्रमाणे यावेळी तिने फारसे अपडेट्स शेअर न करता गोपनीयता राखली. पोस्ट केल्यानंतर काही वेळातच चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने "Congratulations beautiful" असे लिहून शुभेच्छा दिल्या. अनेक चाहत्यांनी मात्र आश्चर्य व्यक्त करत, “ती प्रेग्नंट होती का?” असा सवालही केला. कारण यावेळी इलीआनाने तिची गर्भधारणा फारशी उघड केली नव्हती.
इलीआना आणि मायकेलने मे 2023 मध्ये लग्न केले होते आणि काही महिन्यांनंतर कोआच्या जन्माची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. आता कियानूच्या आगमनाने त्यांच्या कुटुंबात आणखी आनंद भरला आहे. इलीआनाच्या कामाबद्दल सांगण्याचे झाले तर, ‘दो और दो प्यार’ या रोमँटिक ड्रामामध्ये झळकली होती. सध्या तिने तिचा पुढील चित्रपट जाहीर केलेला नाही. मात्र अलीकडेच एका Instagram AMA (Ask Me Anything) सत्रात तिने सांगितले की ‘रेड २’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर तिला आली होती, परंतु वेळापत्रक जुळून न आल्याने तिने ती संधी नाकारली.