Bigg Boss Marathi Season 6 First Teaser : आला गं बाई आला...!! बिग बॉस मराठी 6 चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला...रितेश भाऊचा पहिला लूक
(Bigg Boss Marathi Season 6 First Teaser ) हिंदी बिग बॉस 19 संपल्यानंतर आता मराठी प्रेक्षकांचे लक्ष बिग बॉस मराठीच्या नव्या सीजनकडे लागले आहे. कलर्स मराठीवर येणाऱ्या बिग बॉस मराठी सीजन 6 चे जोरदार प्रमोशन सुरू झाले असून, रोज नवे संकेत समोर येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
अलीकडेच एक खास टीझर शेअर करण्यात आला असून, यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. “शो लवकर सुरू करा” अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
टीझरमध्ये रितेश बिग बॉसच्या होस्टच्या भूमिकेसाठी सज्ज होताना दिसतो. घरासमोर रांगोळी, झेंडे, ढोल-ताशांचा निनाद असा उत्साही माहोल दाखवण्यात आला आहे. लवकरच नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही या टीझरमधून स्पष्ट होते.
मागील सीजनने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. सूरज चव्हाणसारखे स्पर्धक आजही चर्चेत आहेत. आता सहाव्या सीजनची घोषणा होताच चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यंदाची थीम वेगळी असणार असल्याची चर्चा आहे. कोणाला संधी मिळणार आणि कोणाचं नशीब उजळणार, हे लवकरच कळेल. बिग बॉस मराठी सीजन 6 लवकरच कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

