कर्नाटकात झिका व्हायरसची एन्ट्री; पाच वर्षांच्या मुलीला लागण

कर्नाटकात झिका व्हायरसची एन्ट्री; पाच वर्षांच्या मुलीला लागण

पुण्यापाठोपाठ कर्नाटकात झिका व्हायरसची एन्ट्री झाली आहे. पाच वर्षांच्या मुलीला लागण झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यापाठोपाठ कर्नाटकात झिका व्हायरसची एन्ट्री झाली आहे. पाच वर्षांच्या मुलीला लागण झाली आहे. "पुण्याच्या लॅबमधून आम्हाला मिळालेल्या अहवालात पाच वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 5 डिसेंबर रोजी कर्नाटकमधून रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यासोबतच आणखी 2 नमुने पाठवण्यात आले आहेत. इतर दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ज्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ती पाच वर्षांची मुलगी आहे. सध्या आरोग्य विभाग या मुलीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळले होते." अशी माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिली आहे.

तसेच त्यांनी सांगितले की, सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून लवकरच याबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात येणार असल्याची कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com