Protest Against Trees Cut off
Protest Against Trees Cut offTeam Lokshahi

MIDCच्या वृक्षतोडी विरोधात श्राध्द घालत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केले आंदोलन

रस्ता दुरुस्तीसाठी २८२९ झाडांचा बळी
Published by :
Vikrant Shinde

हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई: रस्ता दुरुस्तीसाठी २८२९ झाडे अडथळा ठरत असल्याने या झाडांचा नाहक बळी दिला जात आहे.या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि पर्यावणप्रेमींनी विरोध करून आंदोलन केलें होतें. मात्र प्रशासनाने नागरिकांना अंधारात ठेवून राज्य वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी नसताना कंत्राटदाराला परस्पर परवानगी देवून झाडे उखडून टाकण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.याविरोधात पर्यावरण प्रेमी नागरिकांनी प्रतीकात्मक श्राध्द आंदोलन करून एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केलं.

Protest Against Trees Cut off
रिक्षात विसरलेल्या बॅगेतील अडीच लाखाच्या सोन्याच्या ऐवजासह रोख रक्कम केली परत

महापे एमआयडीसी परिसरात रस्त्याचा दुरुस्तीसाठी २८२९ झाडे स्थलांतरित व् तोडली जाणार आहेत .याला पर्यावरण प्रेमी नागरिकांनी हरकत घेतली होती.या झाडांना राज्य वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घेण्याची गरज होती.मात्र ही परवानगी प्रक्रिया पूर्ण होण्याआधी अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने ऐन पावसाळ्यात क्राँकिटी करणं उरकले जात असल्याचे निदर्शनास आले.या विरोधात पर्यावरण सेवाभावी संस्थेचे बाळासाहेब यांनी गणेश गायकवाड आदी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी प्रतीकात्मक श्राध्द आंदोलन एम आय डी सी कार्यालयाचा प्रवेशद्वारावर करत निषेध केला.यावेळी मुंडण करून अनोखा निषेध करण्यात आला.प्रभारी प्रादेशिक अधिकारी एकनाथ घरत यांनी भेट घेवून निवेदन देत झाडांची कत्तल थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी उपभियांता संतोष कळसकर यांनी राज्य वृक्ष प्राधिकरण मार्फत मंजुरी घेतली नसल्याची कबुली दिली.तरी झाडांची कत्तल सुरूच असल्याने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.भर पावसात काम सुरू असल्याने रस्त्या लगतच्या झाडांचा दररोज बळी जात आहे.

या वेळी पर्यावरण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सत्यवान गायकवाड, गणेश निलगोंडे,मारुरी भिसे,लक्ष्मण मनकुरे,संतोष पाटील,जय म्हात्रे,शिवाजी धनावडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com