Sharad Pawar : वय ८५ तरीही राजकारणात सक्रिय; शरद पवारांचा मासिक पगार ऐकून थक्क व्हाल!
वयाच्या ८५ व्या वर्षीही राजकारणात सक्रीय असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार आजही देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सत्तेत असोत किंवा विरोधात, पवारांच्या मताला वेगळंच वजन असतं आणि अनेकदा ते गेमचेंजर ठरत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, शरद पवारांचा मासिक पगार आणि एकूण उत्पन्न नेमकं किती आहे, याची माहिती अनेकांना माहीत नसते. १९४० साली पुणे जिल्ह्यातील बारामती येथे जन्मलेले शरद पवार गेली ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत. सध्या ते राज्यसभेचे खासदार असून २०२० साली महाराष्ट्रातून निवडून आले आहेत. त्यांचा खासदारकीचा कार्यकाळ एप्रिल २०२६ पर्यंत आहे.
खासदार म्हणून शरद पवारांचा पगार किती?
लोकसभा आणि राज्यसभा खासदारांचे वेतन व भत्ते संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते कायदा, १९५४ नुसार ठरवले जातात. या कायद्यानुसार सर्व खासदारांना एकसमान वेतन दिले जाते. म्हणजेच शरद पवारांनाही इतर खासदारांप्रमाणेच वेतन लागू होतं. २०२५ मध्ये खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुमारे २४ टक्के वाढ करण्यात आली आहे. या वाढीनुसार शरद पवारांचं मासिक मूलभूत वेतन १ लाख २४ हजार रुपये आहे. याआधी हे वेतन १ लाख रुपये इतकं होतं.
पगारासोबत मिळणारे भत्ते
फक्त पगारच नाही, तर खासदारांना विविध भत्त्यांचाही लाभ मिळतो. त्यामध्ये –
प्रवास भत्ता: वर्षाला विमान किंवा रेल्वेने ३४ वेळा मोफत प्रवास
कार्यालय भत्ता: दरमहा २० हजार रुपये (स्टेशनरी, इंटरनेट, कार्यालयीन खर्चासाठी)
वाहन सुविधा: २ वाहने, इंधन व सुरक्षा मोफत
पेन्शन: सेवानिवृत्तीनंतर २५ हजार रुपये मूलभूत पेन्शन, तसेच अतिरिक्त सेवा वर्षांनुसार वाढीव रक्कम
हे सर्व लाभ शरद पवारांनाही लागू होतात.
महिन्याला एकूण किती उत्पन्न?
शरद पवारांसारख्या खासदाराचं एकूण मासिक उत्पन्न (मूलभूत वेतन + विविध भत्ते) पाहिल्यास ते सुमारे २ लाख १० हजार रुपये इतकं असल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व माहिती सरकारी अधिसूचना आणि विश्वसनीय स्रोतांवर आधारित असून, वयाच्या ८५ व्या वर्षीही राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवारांच्या अनुभवासोबतच त्यांना मिळणाऱ्या वेतनाचीही आता मोठी चर्चा होत आहे.
