Air India Flight Fire : दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवासी आणि क्रू मेंबर्सबाबत महत्त्वाची माहिती समोर

Air India Flight Fire : दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवासी आणि क्रू मेंबर्सबाबत महत्त्वाची माहिती समोर

आजही हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

एअरइंडियाच्या विमान अपघातांची मालिका अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे. 12 जुन च्या अहमदाबाद घटनेनंतर तर त्यात अधिकच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. काल सुद्धा एअरइंडियाचे विमान मुंबईच्या रनवेवर घसरल्याचे वृत्त होते त्यातच आजही हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे विमानप्रवास दरम्यान प्रवाश्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एअरइंडियाच्या विमानांमध्ये एकापाठोपाठ एक तांत्रिक बिघाड होतच असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. कालची रनवेवर विमान घसरल्याची घटना ताजी असतानाच आज हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडियाच्या एआय 315 विमानाला अचानक आग लागली. दुपारी 12:12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये एक प्रकारे घबराट निर्माण झाली.

विमान हाँगकाँगहून दिल्लीला पोहोचल्यानंतर गेटवर पार्क झाल्यानंतर प्रवासी उतरत असताना अचानक ऑक्झिलरी पॉवर युनिटला अचानक आग लागली. या आगीमुळे विमानाचे थोडे नुकसान झालेले आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी आणि'क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती यावेळी विमान कंपनीच्या प्रवक्त्याने दिली.

बचावकार्य घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. सिस्टिम डिझाईननुसार एपीयू ऑटोमॅटिक शटडाऊन झालं. त्यामुळे स्थिती लगेचच नियंत्रणात आली. याप्रकरणी संबंधित विमान तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. विमानांमधील त्रुटी, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com