शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात 10 जानेवारीपर्यत मुदतवाढ
आमदार अपात्र प्रकरणात विधान सभा अध्यक्षांना सुनावणीसाठी येत्या 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. आमदार अपात्रताप्रकरणी मुदत वाढवून द्या अशा आशयाची याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल होती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३० डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे निर्देश न्यायालयाने गेल्या सुनावणी वेळी दिले होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावतीने वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, माननीय न्यायालयाने ३१ डिसेंबर पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले होते. अध्यक्ष २८ डिसेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण करणार असून निकाल देण्यासाठी त्यांना काही वेळ हवा आहे. २ लाख ७१ हजार पानांचे सबमिशन असल्यामुळे लगेच निकाल देणे शक्य होणार नाही. सध्या अध्यक्ष सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुनावणी घेत आहे. निकाल देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंतची वेळ वाढवून दिली.