Sangli
Sangli Team Lokshahi

राज्याचे कामगार मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयात नुतूनीकरणासाठी लाखोंची उधळपट्टी

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासाठी राखीव असणाऱ्या संपर्क कार्यालयाच्या नुतूनीकरणासाठी प्रशासनाकडून लाखोंची उधळपट्टी

संजय देसाई|सांगली: राज्याची कामगार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या संपर्क कार्यालय आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.कार्यालयाच्या नुतूनीकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याचा प्रकार समोर आला आहे,अगदी राजेशाही थाट प्रमाणे पालकमंत्री खाडे यांचं हे कार्यालय सुसज्ज करण्यात येत आहे.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासाठी राखीव असणाऱ्या संपर्क कार्यालयाच्या नुतूनीकरणासाठी प्रशासनाकडून लाखोंची उधळपट्टी करण्यात येत आहे.कार्यालय नुतूनीकरणासाठी अक्षरशा 35 लाख रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे.

कार्यालयाची भव्य दिव्यता दिसून यावी, म्हणून महागडे फर्निचर,झुंबर ,आधुनिक पंखे आणि अश्या अनेक शोभेवंत गोष्टी या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन आराखडया मधून मंजूर करण्यात आलेल्या पैशातून हा वारे माप खर्च करण्यात आला आहे.सांगली शहरा सह जिल्ह्यामध्ये अनेक योजना प्रशासकीय निधी अभावी रखडलेल्या असताना पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयातील संपर्क कार्यालयासाठी हा लाखोंची उधळपट्टी करण्याची गरजच काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान पालकमंत्र्यांच्या कार्यालयात सुरू असललेल्या खर्चाबाबत संभाजी ब्रिगेडने माहिती अधिकाराच्या खाली मागवलेल्या माहिती मधून कार्यालयाच्या नूतनीकरणावर कसा खर्च केला जात असल्याची माहिती समोर आली असून संभाजी ब्रिगेडने यावर आता आक्षेप नोंदवला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वास्तविक सभागृह व इतर बैठक व्यवस्था असताना पालकमंत्र्यांसाठी अशा पद्धतीची वेगळी व्यवस्था असणे गरजेचे आहे का ? आणि जरी असेल तर त्यासाठी अशा पद्धतीने जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करणं हे कितपत योग्य आहे ? असा संतप्त प्रश्न देखील आता सांगलीकर जनतेमधून उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com