ताज्या बातम्या
CM Devendra Fadnavis On Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणी फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले की, "वैष्णवीचा..."
फडणवीस प्रतिक्रिया: वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभरात खळबळ, मुख्यमंत्री म्हणाले घटना अतिशय दुर्दैवी.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली होती. वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडवली आहे. राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "वैष्णवीच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी असून मानवतेला काळीमा फासणारी आहे. वैष्णवीचं बाळ आपल्या ठेवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. बाळ सुखरुप राहण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि 10 महिन्यांच्या बाळाला कस्पटे कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहे. वैष्णवीचं बाळ हे तिच्या वडीलांकडे म्हणजेच आजोबांकडे देण्यात आले आहे."