Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

ठाकरे गटाच्या कालच्या दसरा मेळाव्यावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मात्र, फडणवीसांनी प्रतिक्रियेनंतर आता ठाकरे गट आणि भाजपात शाब्दिक वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Published on

थोडक्यात

  • फडणवीसांनी ठाकरेंना दिलेलं हजार रूपयांचे चॅलेंज

  • ठाकरेंच्या भाषणावेळी सभेला पुढे माणसही नव्हती

  • ठाकरेंचे हजार रूपये वाचवल्याबद्दल मनपूर्वक आभार

ठाकरे गटाच्या कालच्या दसरा मेळाव्यावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मात्र, फडणवीसांनी प्रतिक्रियेनंतर आता ठाकरे गट आणि भाजपात शाब्दिक वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरेंनी माझे हजार रूपये वाचवले असे फडणवीस हसत हसत म्हणाले. मात्र, पुढच्याच शब्दात फडणवीसांनी त्यांच्या शैलीत ठाकरेंना शालजोडीत ठेवत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिउत्तर मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ते मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांना ठाकरेंच्या दसरा मेळावा आणि त्यांच्या भाषणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना फडणवीसांनी सर्वात पहिले ठाकरेंचे हजार रूपये वाचवल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले. मी पत्रकारांना विचारलं की, मला एक हजाराचा फटका आहे का? असे विचारले. कारण मी आवाहन केले होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाच्या संदर्भातील एक मुद्दा दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा असे आव्हान केले होते. मी, ठाकरेंचे भाषण ऐकले नाही पण ज्यावेळी ज्याेवळी काही जणांकडून माहिती घेतली त्यावेळी अनेकांनी ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विकासाचा एक मुद्दा घेतला नसल्याचे सांगतले. त्यामुळे ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विकासाच्या मुद्द्यावर न बोलल्याने माझे एक हजार रूपये वाचल्याचे फडणवीस म्हणाले. ठाकरेंच्या भाषणावेळी सभेला पुढे माणसही नव्हती असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

मी, ठाकरेंचे भाषण ऐकले नाही पण ज्यावेळी ज्याेवळी काही जणांकडून माहिती घेतली त्यावेळी अनेकांनी ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विकासाचा एक मुद्दा घेतला नसल्याचे सांगतले. त्यामुळे ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विकासाच्या मुद्द्यावर न बोलल्याने माझे एक हजार रूपये वाचल्याचे फडणवीस म्हणाले. ठाकरेंच्या भाषणावेळी सभेला पुढे माणसही नव्हती असा टोलाही फडणवीसांनी लगावला. त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, पालिकेला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करुन दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवल्याचे फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com