Devendra Fadnavis: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बीड सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हे सध्या पोलिस कोठडीत आहेत, वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडेंकडून त्यांच्य मंत्रिपदाच्या राजिनाम्याची मागणी केली जात आहे. 29 जानेवारीला दिल्लीत माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंडेंनी त्यांच्या राजिनाम्याची दोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात दिली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले तर, लगेच राजीनामा देईन, असं स्पष्ट मत धनंजय मुंडेंनी दिलं. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहिले होते. त्यादरम्यान माध्यमांशी बोलतना फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंडेंच्या राजीनाम्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "असं आहे की, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की, ते त्यांच्या कामासाठी आले होते. मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण, सकाळी आमची भेट झाली होती. कारण, धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामाकरता मी त्यांना भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राजीनाम्या संदर्भात मुंडेंची भूमिका
धनंजय मुंडे म्हणाले की, फडणवीस आणि अजितदादांना सांगितल्यावर मी राजीनामा देईन... माझा बाबत काय निर्णय घ्यायचा आहे ते अजित दादा ठरवतील... काही जण वैयक्तिक रागातून आरोप करतात... मुख्यमंत्र्यांना दोषी वाटत असेल, तर मी राजीनामा देईन मला नैतिकदृष्ट्या मी दोषी वाटत नाही.... देशमुख हत्या प्रकरणात मी प्रामाणिक बोललो, 51 दिवसांपासून मी टार्गेटवर आहे. असं महत्त्वाचं वक्तव्य यावेळी धनंजय मुंडे यांनी केलं आहे.