Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'

फडणवीस प्रतिक्रिया: गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका, 'अशा विधानांना पाठिंबा नाही'.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Devendra Fadnavis On Gopichand Padalkar Statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्योग, रोजगार, ग्रीन स्टील तसेच पडळकरांच्या वक्तव्याचा मुद्दाही स्पष्ट केला.

फडणवीस म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांनी केलेले विधान योग्य नाही. कोणाच्या वडिलांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल बोलणे योग्य नाही. याबाबत मी स्वतः त्यांच्याशी संवाद साधला आहे. मला शरद पवारांचा फोनही आला होता आणि मी त्यांना आश्वस्त केले की अशा विधानांना आमचे सरकार कधीच पाठिंबा देणार नाही.”

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत. मात्र कधी कधी बोलताना त्यांच्या आक्रमक शैलीतून चुकीचा अर्थ निघतो. त्यामुळे मी त्यांना सल्ला दिला आहे की, भविष्यात भाष्य करताना संयम बाळगावा आणि आपल्या वक्तव्याचा अर्थ काय निघेल याचा विचार करावा. त्यांच्यासमोर मोठ्या संधी आहेत, त्या गमावू नयेत.”

यावेळी फडणवीस यांनी स्टील महाकुंभाच्या माध्यमातून ग्रीन स्टील उद्योगात मोठी गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले. गडचिरोली येथे नवे स्टील हब उभे राहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रीन स्टीलसाठी 5 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून यामुळे सुमारे एक लाख रोजगार निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.तसेच लाडकी बहीण योजना संदर्भात गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com