मोदींना हरवण्यासाठी केजरीवाल हे...; - देवेंद्र फडणवीस

मोदींना हरवण्यासाठी केजरीवाल हे...; - देवेंद्र फडणवीस

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. याच पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया येत आहे.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग झाला आहे. त्याने काहीही फरक पडला नाही. विरोधकांनी एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाही.

तसेच मोदींना हरवण्यासाठी केजरीवाल हे काहीही करु शकतात व उद्धव ठाकरे ही कोणाही सोबत जाऊ शकतात. अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. दोघांना आता एकमेकांची गरज आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com