फडणवीस- उद्धव ठाकरे यांची भेट योगायोग नव्हता, ते घडवून आणलं होतं - संदीप देशपांडे
Admin

फडणवीस- उद्धव ठाकरे यांची भेट योगायोग नव्हता, ते घडवून आणलं होतं - संदीप देशपांडे

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी हे दोन्ही नेते विधानभवनाच्या आवारात एकत्र दिसून आले. याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. यावरुन आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आलं. ते दोघेही हसत, गप्पा मारत एकत्र विधिमंडळात गेले.

याच पार्श्वभूमीवर नसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, षडयंत्र करायची तुमची सवय आहे. आधी राज ठाकरे, नारायण राणे यांच्याविरोधात षडयंत्र केलं. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. असे देशपांडे म्हणाले.

तसेच कालची विधानभवनातील भेट हा योगायोग नव्हता. तर तो घडवून आणलेला योग होता. तुम्ही विधानभवनाच्या दारात गप्पा मारत थांबलात. हे न कळण्याइतकं आम्ही मूर्ख नाहीत. गल्लीतल्या शेमड्या पोरालाही कळेल. भाजप-मनसे युती होईल की नाही माहिती नाही. पण भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. दोन हिंदुत्त्ववादी पक्ष एकत्र येऊ नयेत, यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात. त्याच भीतीतून कालची भेट असे संदीप देशपांडे म्हणाले.

फडणवीस- उद्धव ठाकरे यांची भेट योगायोग नव्हता, ते घडवून आणलं होतं - संदीप देशपांडे
विधानभवनात हसत, गप्पा मारत ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com