विधानभवनात हसत, गप्पा मारत ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री
Admin

विधानभवनात हसत, गप्पा मारत ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी हे दोन्ही नेते विधानभवनाच्या आवारात एकत्र दिसून आले. याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. यावरुन आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आलं. ते दोघेही हसत, गप्पा मारत एकत्र विधिमंडळात गेले.

25 तारखेला म्हणजे शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकमेकांशी हसत मुखाने संवाद साधला. या एकत्र एन्ट्रीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com