Governor Koshyari Duplicate Letter to CM
Governor Koshyari Duplicate Letter to CMTeam Lokshahi

Fact Check : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीचं बोगस पत्र व्हायरल

लोकशाहीने या बोगस पत्राची पोलखोल केली आहे.
Published by :
Sudhir Kakde

मुंबई : राज्यपालांच्या सहीचं बोगस पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतंय. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचं बोगस पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकशाहीने या बातमीच्या खोलापर्यंत जाऊन प्रकरणाचा छडा लावला. राजभवनाला विचारुन या पत्राची खातरजमा केल्यानंतर हे पत्र बोगस असल्याचं समोर आलं. (Governor Bhagatsingh Koshyari Fake Letter Viral)

Governor Koshyari Duplicate Letter to CM
MNS | Raj Thackeray | अयोध्या दौरा, भोंगा वाद, आणि आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

29 सप्टेंबर 2020 चं हे बोगस पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतंय. पत्रावर जावक क्रमांकच नसल्यानं पत्र बोगस असल्याचं स्पष्ट झालं. पत्रावर मलबार हील ऐवजी मलबार 'होल' असा पत्ता होता. तसंच पत्रात राज्यपालांनी सुचवलेली आमदार म्हणून 6 नावं होती. सरकारने 12 नावं सुचवण्यापूर्वीची या पत्रावर तारीख आहे. सरकारने 6 डिसेंबरला 2020 ला ही 12 नावे सुचवली होती.

Governor Koshyari Duplicate Letter to CM
''रावणाने सीतेचं अपहरण करून काही गुन्हा केला नाही'', भाजपा आमदाराच्या वादग्रस्त विधानाचा VIDEO VIRAL

दरम्यान, वीरभद्रेश बसवंती, रमेश कोकाटे आडसकरांचं या पत्रात नाव होतं. तर सतीश घरत, संतोष अशोकनाथ, मोरेश्वर भोंडवे, जगन्नाथ शिवाजी पाटील यांचंही या यादीत नाव होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com