ताज्या बातम्या
पुण्यातून 77 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त
बनावट नोटा बाळगणारा तरुण गुजरातमधील असल्याची माहिती
थोडक्यात
पुण्यातून 77 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या
बनावट नोटा बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
बनावट नोटा बाळगणारा तरुण गुजरातमधील असल्याची माहिती
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुण्यातून 77 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बनावट नोटा बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बनावट नोटा बाळगणारा तरुण गुजरातमधील असल्याची माहिती मिळत असून त्या तरुणाकडून 500 रुपयांच्या 142 आणि शंभर रुपयांच्या 61 नोटा अशा 77 हजार रुपयांच्या बनावट पण हुबेहूब दिसणाऱ्या नोटा त्या तरुणाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.