लोणावळ्यातील भुशी धरणात एकाच कुटुंबातील 5 जण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले, 2 जण बेपत्ता

लोणावळ्यातील भुशी धरणात एकाच कुटुंबातील 5 जण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले, 2 जण बेपत्ता

लोणावळ्यातील भुशी धरणात एकाच कुटुंबातील 5 जण बुडाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोणावळ्यातील भुशी धरणात एकाच कुटुंबातील 5 जण बुडाल्याची घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल पाहण्यासाठी हे कुटुंब गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची माहिती मिळत आहे.

अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आले होते. पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हे कुटुंब गेले असता पाण्याचा वेग जास्त असल्याने हे कुटुंब वाहून गेलं. या घटनेत तिघांचे मृतदेह सापडले असून 2 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

नौदलाकडून बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरु आहे. 1 महिला आणि 2 मुलींचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले. बुडालेले कुटुंब पुण्यातील वानवडी सय्यदनगर परिसरातील असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com