Emiway Bantai Threat : आताची मोठी बातमी! एमीवे बंटायला बिश्नोई, गोल्डी ब्रारच्या नावाने धमकी

प्रसिद्ध हिप हॉप रॅपर एमीवे बंटायला लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारच्या नावाने जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Published by :
Prachi Nate

एमीवे बंटाय म्हणून प्रसिद्ध हिप हॉप रॅपर बिलाल शेखला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बंटाय म्युजिक कंपनीच्या मोबाईलवर मेसेज द्वारे ही धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने "मी गँगस्टर गोल्डी ब्रार असून तुझ्या सिंगरकडे 24 तास आहेत. 1 कोटी रुपये दे नाहीतर मारून टाकू अशी धमकी दिली". यापुढे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई ग्रुप, गँगस्टर लॉन ग्रुप, गँगस्टर रोहित गोदरा असा संदेश लिहिण्यात आला आहे.

कालच एमीवे बंटाय म्हणून प्रसिद्ध हिप हॉप रॅपर बिलाल शेख याने ट्रिब्युट टु सिद्धू मुसेवाला हे गाण प्रसिद्ध केलं होतं. ट्रिब्युट टु सिद्धू मुसेवाला हे गाण प्रदर्शित केल्यानंतर धमकी आल्याने प्रकरण गंभीर झालं आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून अधिक तपास सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com