Rajeshwari Kharat : 'फैंड्री' फेम शालूने बदलला धर्म; नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया वेधलं सर्वांचे लक्ष
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फैंड्री' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारी राजेश्वरी खरात सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. राजेश्वरीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमुळे आता चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. तिची ही पोस्ट पाहून तिने धर्मांतर केल्याचं समोर आले आहे.
काय आहे राजेश्वरीच्या पोस्टमध्ये?
राजेश्वरीने केलेल्या पोस्टमध्ये ती पाण्यात हात जोडून, डोळे बंद करुन उभी आहे .एका व्यक्तीचा हात तिच्या हातावर आणि डोक्यावर दिसतंय,तर दुसऱ्या व्यक्तीचा हात तिच्या खांद्यावर दिसत आहे. हा पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'Baptised' असे लिहिले आहे. याचा अर्थ तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे असा होतो. त्यासोबतच तिने रेड हार्ट इमोजी सुद्धा कॅप्शनमध्ये दिला आहे.
राजेश्वरी केलेल्या या पोस्टमध्ये नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकऱ्यांनी लिहिले की, "कदाचित शूटिंग आहे.... लई लोड घेऊ नका चर्चेत येण्यासाठो केलेला एक निरागस स्टंट वाटतोय.. बाकी काही नाही". दुसऱ्या एका नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, "पैशासाठी काही पण", तिसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, "फार मोठी चूक केलीस". चौथा नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, "विनाशकालितविपरीतबुध्दी". पाचव्या नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, "जब्या वाचलास लगा" अशा नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपुर्वी तिचे आणि सोमनाथ अवघडेचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. पण ते फोटो एका प्रोजेक्टचा भाग असल्याचे समोर आले होते.