
(Lionel Messi) जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार आहे. आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येणार असून मुंबईत मेस्सीचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी कोलकात्यातील युवभारती स्टेडियममध्ये लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ निर्माण झाला.
काही प्रेक्षकांनी संतापातून बाटल्या व खुर्च्या फेकून मैदानातील साहित्याचे नुकसान केले.
परिस्थिती गंभीर होताच सुरक्षेसाठी रॅपिड ॲक्शन फोर्सला पाचारण करण्यात आले.
मेस्सी पहाटे कोलकात्यात दाखल झाल्यानंतर शहरात त्याचा भव्य पुतळा ऑनलाइन पद्धतीने उघड करण्यात आला.
सकाळी सुमारे साडे अकराच्या सुमारास मेस्सी स्टेडियममध्ये पोहोचला.
राजकीय व्यक्ती, माजी खेळाडू आणि आयोजकांनी त्याला वेढल्यामुळे सामान्य प्रेक्षकांना तो नीट दिसला नाही.
त्यामुळे स्टँडमध्ये बसलेले चाहते निराश झाले आणि संताप व्यक्त करू लागले.
अनेकांनी हजारो रुपयांचे तिकीट काढूनही मेस्सीला खेळताना पाहता न आल्याची खंत व्यक्त केली.
कार्यक्रम संपल्यानंतर काही लोकांनी स्टेडियममधील तात्पुरत्या उभारण्या तोडफोड केल्या.
या घटनेची गंभीर दखल घेत राज्यपालांनी राज्य सरकारकडे संपूर्ण अहवाल मागवला असून, प्रेक्षकांच्या भावना दुर्लक्षित झाल्याचा सवाल उपस्थित केला आहे.