Rinku Singh
Rinku Singh

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या मुख्य संघात रिंकू सिंगला डावललं, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आवळला नाराजीचा सूर

बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात १५ खेळाडूंची निवड केली आहे. तसंच ४ राखीव खेळाडूंचा समावेशही करण्यात आला आहे.
Published by :

Team India Squad For T20 World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ जून महिन्यात सुरु होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात १५ खेळाडूंची निवड केली आहे. तसंच ४ राखीव खेळाडूंचा समावेशही करण्यात आला आहे. या चार खेळाडूंमध्ये शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमदच्या नावाचा समावेश आहे.

भारतीय संघात १५ खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये रिंकू सिंगला संधी मिळाली नाही. त्यामुळे रिंकूच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मिम्सचा वर्षाव केला आहे. रिंकू सिंगला पाठिंबा देण्यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विविध पोस्टचा वर्षाव केला आहे.

भारतीय संघाच्या १५ खेळाडूंच्या लिस्टमध्ये रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगच्या नावाचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com