ताज्या बातम्या
Chhatrapati Sambhajinagar Farmer Suicide : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्याने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर...
दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिवाळीतच शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आणि स्वत:चे आयुष्य संपवले.
दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिवाळीतच शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आणि स्वत:चे आयुष्य संपवले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाहेगाव येथील अंकुश रामभाऊ शिंदे असे शेतकऱ्याचे नाव आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिाकणी पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. यामुळे सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार होते. मात्र शासनाकडून अंकुश रामभाऊ शिंदे यांना मदत मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांकडून आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेत्यांकडून आरोप करण्यात आला आहे.