कापूस प्रश्नाबाबत पाचोरा येथे शेतकरी आक्रमक , पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अडवला ताफा

कापूस प्रश्नाबाबत पाचोरा येथे शेतकरी आक्रमक , पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अडवला ताफा

कापूस प्रश्ना बाबत पाचोरा येथे शेतकरी आक्रमक , पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अडवला ताफा
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मंगेश जोशी, जळगाव

कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून कापसाला शासनाने 12 हजारापेक्षा जास्त हमीभाव जाहीर करावा या मागणी साठी राज्यभरात शेतकऱ्यांनी अनेक आंदोलन देखील केले आहेत. तर कापूस कोंडी सोडण्यासाठी पाचोरा येथील शेतकरी अधिवेशन काळात मंत्रालयावर धडकले होते.

मात्र तरी देखील कापूस प्रश्नाबाबत शासन लक्ष देत नसल्याने पाचोरा येथील शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी पाचोरा येथील जामनेर रस्त्यावर आमदार ,खासदार , मंत्री यांना गाव बंदी आंदोलन पुकारले असून याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेळाव्यासाठी पाचोरा येथे आलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा शेजाऱ्यांनी अडवत कापसाला 12 हजार 300 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी गुलाबराव पाटील यांना निवेदन देवून आपली व्यथा मांडत तात्काळ कापसाला हमीभाव द्यावा अशी मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com