मोर्शीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा

मोर्शीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा

विदर्भात सततच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे,
Published by :
Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

विदर्भात सततच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. आज अमरावतीच्या मोर्शी तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी,सोयाबीन ला प्रतिक्विंटन ८ हजार ५०० रुपये,कपाशीला 12 हजार रुपये व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करा नाही तर पिक विमा कंपन्यांनी मोबदला दिला नाही तर एकही विमा कार्यालय आम्ही जाग्यावर ठेवणार नाही.

काल आमच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत ट्रेलर दाखवला असून पिक्चर मुंबईत लवकरच दाखवण्यात येईल असा सणसणीत इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. यापूर्वी मुंबईत आम्ही गांधीजींच्या मार्गाने आलो होतो मात्र आता आम्ही मुंबईला पुन्हा भगतसिंग डोक्यामध्ये घेऊन येऊ तेव्हा सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली असेल इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला, दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com