'लाँग मार्च' मधील शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांना पाच लाखांची मदत

'लाँग मार्च' मधील शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांना पाच लाखांची मदत

शेतकरी लाँग मार्चच्या दरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

शेतकरी लाँग मार्चच्या दरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५ वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः या घटनेची माहिती दिली. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com