मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौ-यात शेतकरी 'समृद्धी' महामार्गावर
Admin

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौ-यात शेतकरी 'समृद्धी' महामार्गावर

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले असता येथील शेतकरी विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

भूपेश बारंगे, वर्धा

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले असता येथील शेतकरी विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र, पोलिस यंत्रणेने त्यांना हटविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतक-यांना शेतात जाणे-येणे बंद केल्यामुळे रोष व्यक्त होत होता.ज्या शेतक-यांच्या जमिनी समृद्धी महामार्गात गेल्यामुळे त्यांना शेतात ये-जा करण्यासाठी समृद्धी महामार्गाचा उपयोग करावा लागतो. अजूनपर्यंत शेतक-यांसाठी सर्विस रोड तयार करण्यात आले नाही. त्यामुळे शेतक-यांना शेती करणे कठीण झाले आहे. समृद्धी महामार्गामुळे यावर्षी हजारो हेक्टर शेती पावसाने पडीक पडल्या. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने पक्का रोड द्यावा, शेतातील पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करावी, जेणेकरून शेतक-यांच्या शेती पडीक राहणार नाही, नदी, नाले, ओटे नैसर्गिक संपत्ती यांना छेडखानी करून त्यांचे मार्ग बदलवू नये, ज्या शेतक-यांना शेतीची मोबादला मिळाले नाही तो त्वरित द्यावा, शेतक-यांच्या जमिनी मोजून द्याव्यात यासह विविध मागण्यासाठी शेतकरी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी रस्त्यावर आले होते. मात्र, पोलिस यंत्रणेने त्यांना हटविले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. यावेळी वैभव वानखेडे, प्रभाकर लोणकर, दिपक भांडेकर, गजानन वानखेडे, प्रमोद नवीजवार, सुयोग ठाकरे, कोमल भांडेकर व इतर शेतकरी यावेळी उपस्थिती होते.

शेतक-यांच्या समस्या सोडवा

जोपर्यंत शेतक-यांच्या समस्या सुटणार नाही, तोपर्यंत समृद्धी महामार्ग सुरु होणार देणार नाही, असा इशारा यावेळी शेतक-यांना दिला. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने पक्का रोड द्यावा, अशीही मागणी यावेळी शेतक-यांनी केली.

शेतात जाण्यास मनाई

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते. अनेक शेतक-यांना याची माहिती नव्हती. या मार्गावरून नेहमीच शेतकरी जात असते. मात्र, सकाळपासून पोलिस यंत्रणेने शेतक-यांना जाण्यास मनाई केली होती. त्यामुळे शेतक-यांचे जनावरे शेतात रात्रीपासून उपाशी होते. जनावरांना चारापाणी कुणी देणार, या विवंचनात शेतकरी होते. जाणे-येणे बंद केल्यामुळे शेतक-यांची शेतातील काम खोळंबली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com