दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नसल्याने शेतकरी आक्रमक
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात सुरु आहे.
थोडक्यात
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार
केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नसल्याने शेतकरी आक्रमक
केंद्र सरकराच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन
शेती उत्पादनांना किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे पायी निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना शनिवारी केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आज पुन्हा दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे शेती उत्पादनांना देण्यात येणाऱ्या किमान हमीभावाची कायदेशीर हमी मिळावी.
पंजाबचे शेतकरी नेते सस्वनसिंग पंधेर यांनी शनिवारी सांगितले, "अद्याप केंद्र सरकारकडून चर्चेसाठी कोणताही संदेश आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आता रविवारी सकाळी दिल्लीच्या दिशेने निघतील. शेतकऱ्यांनी सोबत ट्रॅक्टर किंवा इतर वाहने घेतलेली नाहीत, तरीही त्यांना का अडवले जात आहे?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.