ताज्या बातम्या
1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक
1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक करण्यात आला आहे.
थोडक्यात
1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक
सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण 2014मध्ये सुधारणा
पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार
1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे आता पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार असून यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे.
फास्ट - टॅग सुरु नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्ट-टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.