Putrada Ekadashi Vrat: संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत विशेष लाभदायी
आज 10 जानेवारी, शुक्रवार, पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी विशेष महत्त्वाचे आहे. या दिवशी भगवान विष्णुची पूजा केल्याने केवळ पुत्र प्राप्तीच नाही तर जीवनात सुख-समृद्धीही प्राप्ती ही होते.
हिंदू धर्मात पुत्रदा एकादशी शुभ फलदायी मानली जातो. पौराणिक कथांनुसार ज्या महिला हे व्रत मनोभावे करतात, त्यांच्या पुत्रांसंबंधी सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णुची पूजा आणि त्यांच्या मंत्रांचा जप करतात. पुत्रदा एकादशीच्या माहात्म्याचं पठण करतात.
हिंदू पंचांगानुसार पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते. हे दोन्ही व्रत संतान प्राप्त करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण मानलं जाते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते. तर दुसरी पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्यात येते. या दोन्ही एकादशीला भगवान विष्णुची पूजा आराधना केली जाते.
पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे?
1. सूर्योदयाआधी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे.
2. भगवान विष्णुच्या प्रतिमेला गंगाजल वहावे. प्रतिमेस फूल, तुलसी दल, पिवळे वस्त्र आणि मिठाई अर्पण करावी.
3. पुत्रदा एकादशीच्या व्रताची कथा ऐकावी.
४. भोजन- फक्त फलाहार करावा. जल ग्रहण करावे.