Sindhudurg Accident
Sindhudurg Accident

Sindhudurg Accident : मुंबई-गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 23 जण जखमी

मुंबई-गोवा महार्गावर कणकवली येथे आरामबस पलटून भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

मुंबई-गोवा महार्गावर कणकवली येथे आरामबस पलटून भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

Sindhudurg Accident
Mumbai Goa Highway Accident : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती. या बस 36 प्रवासी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com