समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
Admin

समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका अजूनही सुरूच आहे.

सुरज दाहाट, अमरावती

समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका अजूनही सुरूच आहे. आज सकाळी ६ वाजता दरम्यान अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे ट्रकला भीषण अपघात झाला आहे. १५ फूट उंच असलेल्या समृध्दी महामार्गावरून ट्रक थेट जमिनीवर कोसळला आहे. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर वाहक गंभीर जखमी झाला आहे. दोघांना धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तारेने भरून GJ 16AV 1714 क्रमांकाचा ट्रक नागपूर वरून मुंबई कडे जात असताना सकाळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेदुरजना खुर्द दरम्यान चालक आशिष तिवारी (21) याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट समृध्दी महामार्गाच्या पुलावरून खाली असलेल्या रस्त्यावर कोसळला आहे. यात चालक आशिष तिवारी याचा दबून जागीच मृत्यू झाला आहे तर वाहक संतोष केवट (28)हा गंभीर जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तातडीने त्यांना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सद्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.या अतिशय वेगवान समृद्धी महामार्गावर नेहमी अपघाताचे प्रमाण वाढले आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com