Pune Accident: पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक

Pune Accident: पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक

या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी एक घटना घडली होती. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने सोमवारी त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अग्रवाल पसार होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. आज अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला मंगळवारी सकाळी संभाजीनगर भागातून अटक करण्यात आली आहे. विशाल अग्रवालांना पुण्यात आणलं जाणार आहे. उद्या विशाल अग्रवाल यांना कोर्टात हजर करणार आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिस अवलिया आणि अश्विनी कोस्ता अशी मृतांची नावे होती. अश्विनी हिचा जागीच मृत्यू झाला तर अनिस अवलिया याने हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. हे दोघे राजस्थनामधील होते. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com