सांगलीच्या इस्लामपुरात दीड टन रेड्याचा पाचवा वाढदिवस; शिवार कृषी प्रदर्शनात रेडा ठरतोय आकर्षण
Admin

सांगलीच्या इस्लामपुरात दीड टन रेड्याचा पाचवा वाढदिवस; शिवार कृषी प्रदर्शनात रेडा ठरतोय आकर्षण

सांगलीच्या इस्लामपुरात दीड टन वजनाच्या रेड्याचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला.

संजय देसाई, सांगली

सांगलीच्या इस्लामपुरात दीड टन वजनाच्या रेड्याचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला. इस्लामपुरात भरलेल्या शिवार कृषी प्रदर्शनात हा रेडा सर्वांचे आकर्षण ठरतोय. मंगसूली येथील विलास नाईक यांचा गजेंद्र नावाचा रेडा पाच वर्षाचा झाला आहे. त्याचा 20 जानेवारी हा वाढ दिवस होता. हा दीड टन वजनाचा रेडा असून त्याची किंमत 50 लाख आहे.

सध्या तो इस्लामपूर येथे सुरू असलेल्या शिवार कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरला आहे . प्रदर्शनाचे आयोजन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी या प्रदर्शनात त्याचा वाढ दिवस ऊस्ताहात साजरा केला. यावेळी महिलांनी त्याला ओवाळलेही. अगदी एखाद्या घराच्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करावा असा वाढदिवस एका रेड्याच्या साजरा होतोय यात नवल काही नसावे मात्र 50 लाखाच्या या रेड्याच्या वाढदिवस सांगली जिल्ह्यात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com