कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख

शिंदे गट ठाकरे गटाला नेहमीच धक्क्यांवर धक्के देत असते. तसेच शिंदे गटातील मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकमेकांवर नेहमीच प्रतिक्रिया देत असतात.
Published by  :
Siddhi Naringrekar

संजय राठोड, यवतमाळ

शिंदे गट ठाकरे गटाला नेहमीच धक्क्यांवर धक्के देत असते. तसेच शिंदे गटातील मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकमेकांवर नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. सध्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होताना पाहायला मिळत आहेत.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना अश्लील शिवीगाळ करून अपशब्द वापरले व त्यांचा अनादर करून अब्रूचे नुकसान केले. त्यामुळे कृषीमंत्र्याविरुद्ध भारतीय दंड विधीनियम 294 व 509 अन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख यांनी पुसद शहर पोलिसात दिली आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख
मी जे शब्द बोललो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीय- अब्दुल सत्तार

खासदार सुप्रिया सुळे या अतिशय विनम्र व अभ्यासू महिला नेत्या असून देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या त्या सदस्य आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचे उंच असे स्थान निर्माण केले आहे. मंत्री सत्तार यांच्या कृत्यामुळे त्यांचा अपमान होवून अनादर झालेला आहे. ही बाब महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांचे मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने दखल घेवून गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख
'तर मी दोन दिवसांत राजीनामा देणार', कृषिमंत्री अब्दुल सत्तार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com