गाय व शेतकऱ्याचं अतुट नातं! लंपी आजाराने मरण पावलेल्या गायीची केली शेतकऱ्याने तेरवी

गाय व शेतकऱ्याचं अतुट नातं! लंपी आजाराने मरण पावलेल्या गायीची केली शेतकऱ्याने तेरवी

अकोल्यात अनोख्या तेरावीची सर्वत्र चर्चा
Published by :
Vikrant Shinde

अमोल नांदूरकर, अकोला

अकोल्यात एक तेरवीचा कार्यक्रम चांगलाचं चर्चेचा विषय ठरलाय. हा तेरवीचा कार्यक्रम होता एका गाईचा (गौवंश). आज भारतात गाईला मातेचं स्थान दिले आहे, तिचा कायमच सन्मान केला जातो. अकोल्यातही एका कुटुंबात सलग २० वर्षांपासून एक गाय सदस्याप्रमाणे होतीय. कुटुंबातील सर्व सदस्यांचा गाईशी जिव्हाळा होता, अचानक पणे तिचा लम्पी आजारामुळे मृत्यु झाला. त्यानंतर, गाईची अंत्ययात्रा काढली आणि सर्व परंपरानुसार तिच्यावर अंत्यसंस्कार केले. एवढेच नव्हे तर तेरा दिवसांनी गाईच्या मालकाने तिची तेरवीही केली. त्यासाठी गावातील लोकांना जेवायला बोलावले होते. घरापुढे मंडप घातला होता. मंडपात मध्यभागी टेबलवर 'फोटो ठेवला होता. जेवायला येणारे लोक आधी त्या गाईला फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहायचे. मग भोजनाच्या रांगेत लागायचे.

दरम्यान, लम्पी चर्मरोगामुळे राज्यात हजारो जनावरे दगावली आहेत. अनेक वर्ष पालन-पोषण करून संगोपन केलेले जनावर आजाराने ग्रस्त झाल्यानंतर काही दिवसातच दम तोडत आहेत. आजारामुळे शेतकरी वर्ग हळहळला जातोय. आपल्या जनावरांवर आलेल्या संकटाने चिंतीत आहेय. अकोला जिल्ह्यातील आगर येथून जवळच असलेल्या खेकडी गावातील शेतकरी सारंगधर गुणवंत काकड यांच्या गाईला लम्पीची लागण झालीय. त्यांनी गाईवर उपचार केले. मात्र, व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक होता. त्यामुळे २७ ऑक्टोबर रोजी आजारामूळ गाईचा मृत्यू झाला. आपल्या लाडक्या गाईच्या मृत्यूमुळे काकड कुटुंबाला मोठे दु:ख झाले. त्यांनी गाईला अत्यंत भावपूर्ण निरोप दिला.

काकड यांनी परंपरेनुसार गाईवर अंत्यसंस्कार केले. साडी-चोळी, हार, फुलांसह गाईला पुरलं. या वेळी मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते. इथंचं न थांबता तेरा दिवसांनी त्यांनी गाईची तेरवी करण्याचं ठरवलं. त्यानुसार काल गुरुवारी तेरवीचे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी गावातील लोकांना निमंत्रणही देण्यात आलं. या तेरवीच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येत गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, काकड़ यांनी आपल्या गाईच्या अनपेक्षित मृत्यूनंतर तिला घरातील कुटुंबासारखाच निरोप देत तिच्या स्मरणात तेरवीचेही आयोजन केले. मुख्य म्हणजे तेरवीमध्ये संपूर्ण गावाला जेवण दिल्याने या शेतकऱ्याची भावपूर्ण अभिवादनाची सध्या जिल्हाभर चर्चा होतंय.

तब्बल २० वर्षांपासून गाईची सोबत

"तब्बल २० वर्षांपासून ही गाय काकड कुटुंबाच्या एका सदस्याप्रमाणे होती. कुटुंबातील सर्व सदस्यांचा गाईशी चांगला जिव्हाळा होता. त्यामुळे तिचा मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक ठरलाय. तिच्या स्मरणात तेरवी करून गावातील सर्वांना निमंत्रण देऊन जेवण दिले. या वेळी सर्व लोकांनी निमंत्रणाचा मान ठेवत कार्यक्रमासाठी हजेरी लावली." असंही शेतकरी काकड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com