Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 8 तास उलटले राजा अजूनही चौपाटीवर! गणेश गल्लीचे कार्यकर्ते मदतीला धावताच राजाचा पाट सरकला

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 8 तास उलटले राजा अजूनही चौपाटीवर! गणेश गल्लीचे कार्यकर्ते मदतीला धावताच राजाचा पाट सरकला

लालबागचा राजाचे समुद्राच्या भरतीमुळे मूर्तीचे विसर्जन करण्यास विलंब झाला. अखेर गणेश गल्लीचे कार्यकर्ते लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मदतीला धावून आले.
Published by :
Prachi Nate
Published on

लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा अनपेक्षित अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अपेक्षित वेळेत मूर्तीचं विसर्जन होऊ शकलेलं नाही. समुद्रात भरती असल्यामुळे मंडळासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

यंदा प्रथमच विसर्जनासाठी अत्याधुनिक मोटराइज्ड तराफा वापरण्यात आला होता. 360 अंशात फिरण्याची क्षमता आणि स्प्रिंकलर्ससारख्या विशेष तंत्रज्ञानामुळे सोहळा भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, समुद्राच्या वाढलेल्या पाण्यामुळे या नव्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचण निर्माण झाली.

तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन अखेर पारंपरिक जुना तराफा पाण्यात उतरवण्यात आला आहे. मात्र भरतीमुळे त्यावरही मूर्ती बसवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे विसर्जन काही काळ पुढे ढकलण्यात आलं आहे. या परिस्थितीत कोळी बांधव मदतीसाठी दाखल झाले आहेत. लालबागच्या राजाचे कोळी बांधवांकडून दागिने उतरवले असून, राजाचा विसर्जन सोहोळा निर्विघ्न पणे पार पडावा या साठी प्रयत्न सुरु आहेत.

समुद्राची भरती कमी झाल्यानंतरच विसर्जनासाठी पुढील प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा सोहळा संध्याकाळपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. जर आता विसर्जन झाले नाही तर रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेव्हा पुन्हा समुद्राला भरती येईल, तेव्हा लालबागच्या राजाचे विसर्जन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गणेश गल्लीचे कार्यकर्ते मदतीला धावले

सकाळी 8 वाजल्यापासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला होता, दरम्यान समुद्राच्या भरतीमुळे मूर्तीचे विसर्जन करण्यास विलंब झाला. आता तब्बल 6 ते 7 तास उलटून गेल्यानंतर अजून देखील लालबागचा राजा तराफ्यावर चढण्यास यश आलेले नाही.

अखेर गणेश गल्लीचे कार्यकर्ते लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून आले. दरम्यान दोन्ही कार्यकर्त्यांना मिळून लालबागच्या राजाचा पाट हलवण्यास यश आले आहे. मात्र, अजूनही समुद्रतील पाणी कमी झालेले नसल्यामुळे लालबागचा राजाला विसर्जनासाठी संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com