ताज्या बातम्या
Gold - Silver Price : अखेर सोने-चांदीच्या दर खालवला! चांदी 33 हजारांनी घसरला तर सोन्याच्या दरात मोठी अपडेट
सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळी दरम्यान सोन्याच्या भावात कायम वाढ होत असताना, सर्वांनीच अनुभव घेतला आहे. 
सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळी दरम्यान सोन्याच्या भावात कायम वाढ होत असताना, सर्वांनीच अनुभव घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर सोन्याच्या व चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात 14 हजार रुपयाची तर 24 तासात पाच हजार रुपयाची घसरण झाले आहे.
सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरातही आठ दिवसांमध्ये 33 हजारांची तर 24 तासात सात हजार रुपयाची घसरण झाली असल्याने, ग्राहक सोने व चांदी खरेदी करण्यासाठी पुन्हा गर्दी करत असल्याचे चित्र सुवर्णनगरीमध्ये पाहायला मिळत आहे.
सोने व चांदीच्या दरात घसरण जी होत आहे त्याचे आम्ही स्वागतच करतो मात्र, अजून या दरात घसरण व्हावी अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे. तर 2026 मध्ये सोन्याचे दर एक लाख 40 हजारापर्यंत जाण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

