अखेर मनसेला शिवाजी पार्कवर 17 तारखेला सभा घेण्यास परवानगी

अखेर मनसेला शिवाजी पार्कवर 17 तारखेला सभा घेण्यास परवानगी

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता अखेर मनसेला शिवाजी पार्कवर 17 तारखेला सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मनसेला 18.3.24 च्या अर्जानुसार परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

मनसेला शिवाजी पार्क मैदान मिळाल्यामुळे आता महायुतीची सांगता सभा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. नगरविकास विभागाकडून मनसेला सभा घेण्यास अखेर परवानगी दिल्यामुळे ठाकरे गटाकडून दुसऱ्या मैदानाची चाचपणी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

मोदी मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांचा मुंबईत रोड शो देखील होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सभेतून जनतेला संबोधित करणार आहे. शिवाजी पार्कवर 17 मे रोजी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची संयुक्त सभा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com