crime
crimeTeam Lokshahi

अखेर ‘ती’ बेपत्‍ता तरुणी सापडली; ‘लव्‍ह जिहाद’ साठी अपहरण झाल्याचा आरोप

बुधवारी खासदार नवनीत राणा यांनी येथील राजापेठ पोलीस ठाण्‍यात धडक दिली आणि बेपत्‍ता तरुणीचा तत्‍काळ शोध घ्‍यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

काल (बुधवारी) खासदार नवनीत राणा यांनी येथील राजापेठ पोलीस ठाण्‍यात धडक दिली आणि बेपत्‍ता तरुणीचा तत्‍काळ शोध घ्‍यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली. दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्‍याचे सांगून घरून बेपत्‍ता झालेली १९ वर्षीय तरुणी बुधवारी रात्री उशिरा सातारा येथे सापडली. सातारा रेल्‍वे पोलिसांनी या मुलीला गोवा एक्‍स्‍प्रेसमधून ताब्‍यात घेतले. ‘लव्‍ह जिहाद’साठी या तरुणीचे अपहरण करण्यात आल्‍याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.

रुक्मिणी नगरात राहणारी ही तरुणी बेपत्‍ता झाल्‍यानंतर तिच्‍या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. एका विशिष्‍ट समुदायातील युवकाने तरुणीचे अपहरण केल्‍याचा संशय त्‍यांनी व्‍यक्‍त केला होता. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयित युवकाला ताब्‍यात घेऊन चौकशी सुरू केली होती, पण युवकाने आपण अपहरण केले नसल्‍याचे सांगितले.

या दरम्‍यान, त्‍यांनी आपले मोबाईलवरील संभाषण पोलीस निरीक्षकांनी ध्‍वनिमुद्रित केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com