अखेर लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपली...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीला एकहाती सत्ता मिळण्यामागे लाडकी बहिण योजना ही गेम चेंजर ठरली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मात्र, राज्यातील तमाम महिला वर्गाचं एकाच बातमीकडे लक्ष वेधलं आहे. लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता कधी येणार या घोषणेकडे महिला वर्गाचे लक्ष वेधलं आहे. अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेविषयी विरोधकांनी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या होत्या. निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याचा प्रचार करण्यात आला होता. तर दुसरीकडे लाडकी बहिण योजनेतील पैसे वाढवून देणार असल्याचं आश्वासन सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही केलं होतं. अखरे आता या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.
महायुती सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. महायुती सरकारची ही महत्त्वकांक्षी योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलैपासूनचे ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हाफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र, आता डिसेंबरचा हफ्ता सरकार कधी जमा करणार? खात्यामध्ये पैसे किती जमा होणार? 1500 की 2100 याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात दिली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाही. आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-