Churchgate Station Fire : ऐन गर्दीच्या वेळी चर्चगेट स्थानकावर शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, प्रवाशांची उडाली तारांबळ
चर्चगेट रेल्वे स्थानकात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रेल्वे स्थानकावरील एका केकच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली, असल्याची प्राथमिक बातमी समोर येत आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांची आणि रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रवाशांची कामावरुन घरी जाण्याची वेळ असल्याने स्थानकावर एकच गदारोळ सुरु झाला.
पश्चिम रेल्वेवरील महत्वाचे स्थानक असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकात आग लागली आहे. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.एका केक शॉपमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली. हा परिसर बऱ्याबैकी बंदिस्त असल्यानं सगळीकडे धूर पसरला. रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या भुयारी मार्गातून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले. त्यामुळे भुयारी मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला.आग लागल्याचे समजताच त्वरित अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कामावरून घरी जाण्याची लोकांच्या घाईच्या वेळेला हा प्रकार घडल्याने प्रवासी काही काळ घाबरले होते.
रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच हे केक चे दुकान असल्यामुळे धुराचे लोट स्टेशन परिसरात पसरले आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असुन सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणुन त्या दुकानाच्या आजूबाजूची दुकाने ही खाली करण्यात आली आहेत . या केक च्या दुकानात लाकडाचे फर्निचर जास्त असल्यामुळे ही आग जास्त भडकल्याचे सांगण्यात येत आहे.